प्रतिनिधी/उस्मानाबाद
तालुक्यात दुष्काळाची दिवसेंदिवस दाहकता वाढत चालली आहे. जनावरांच्या चारा-पाण्याचा गंभीर प्रश्न बनला आहे. तालुक्यात पाच ठिकाणी चारा छावण्या सुरू आहेत. एकीकडे चारा छावणीचालकांना देयके अद्याप मिळाली नाहीत, तर दुसरीकडे शासनाकडून चारा छावण्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे, बसविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देयके न मिळाल्याने खर्च भागविताना छावणीचालकांचा जीव मेटाकुटीला येत आहे. आता छावणीत जनावरांच्या सुरवातीच्या एंट्रीलाच सीसीटीव्ही कॅमे-याची नजर असणार आहे.
तालुक्यात चोराखळी, मोहा, वाठवडा, पाथर्डी, येरमाळा येथे चारा छावण्या सुरू आहेत. दुष्काळाच्या चटक्याने पशुपलाक हैराण झाले आहेत. छावण्यांमध्ये दिवसेंदिवस जनावरांची संख्या वाढू लागली आहे. जनावरांना चारा, पशुखाद्य तसेच छावणीत दररोज जनावरे किती आली, बाहेर किती गेली, यावर नजर ठेवण्यासाठी छावण्यांत जनावरांच्या एंट्रीलाच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सक्त सूचना शासनाच्या आदेशाने प्रशासनाने केल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक छावण्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. छावणीचालकांची देयके आदा करण्यासाठी मागील आठवडयात ४२ लाख रूपये तहसील कार्यालयाकडे प्रापत झाले आहेत. मात्र अद्यापपर्यंत चालकांना देयके मिळाली नाहीत.त्यामुळे छावणीतील जनावरांना सुविधा देण्यासाठी भांडवल उभे करता करता चालकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. छावण्या सुरू होऊन दीड महिन्याच्या कालावधी लोटला तरी छावणीचालकांना अद्याप अनुदान मिळाले नाही. जनावरांच्या दररोजच्या चारा-पाण्यावर या छावणीचालकांना लाखो रूपये खर्च करावे लागत असून, हा पैसा आणायचा कोठून, असा प्रश्र आता चालकांना पडला आहे. तालुक्यात पाच ठिकाणी चारा छावण्याच्या माध्यमातून जनावरांसाठी चारा-पाण्याची सोय करण्यात आली आहे. त्यानुसार पाथर्डी येथे लहान-मोठी ५०९, मोहा येथ्े दोन हजार ७३, वाठवडा येथे ८५०, येरमाला येथे एक हजार ८०० अशी ६ हजार ३७२ जनावरे दाखल आहेत. या छावण्यातील सोयीसुविधांसह जनावरांवर आता सीसीटीव्ही कॅमे-याची नजर राहणार आहे.