भूम/प्रतिनिधी-
भूम तालुक्यातील चाराछावणी मालक शासनाच्या जाचक अटींना विरोध करत येत्या
20 तारखे पर्यंत बिल न मिळाल्यास छावणी बंद करण्याचा इशारा दिला आहे.
भूम तहसीलमध्ये छावणी मालक यांना मार्गदर्शन पर मिटिंग बोलावली असता तालुक्यातील सर्व छावणी चालक आले सर्व मार्गदर्शन घेऊन नवीन चारा छावणी प्रणाली ऍप ला विरोध करीत पेशकार दामवाले यांना निवेदन देण्यात आले.
प्रामुख्याने ऍप व त्यासाठी लागणारी मनुष्यबळ व प्रत्येक छावणी मध्ये 300 ते 3000 इतकी लहान मोठी जनावरें असल्याने या ऍप वापरणे शक्य नाही,अनेक शेतकरी यांच्या कडे 5 पेक्षा जास्त जनावरे असून सर्रास एकच रेशन कार्ड असल्याने अडचण आहे सध्या छावणी चा कार्यकाल ही संपत आला आहे, भीषण दुष्काळ परिस्थितीमुळे सध्या पाणी व चारा जिल्यात मिळत नसल्याने पर जिल्यातून चारा आणणे गरजेचे असल्याचे सांगत होते तर जनावरांन मागे शासनाने देऊ केलेले 80 ते 90 रु अनुदान 120₹ करून द्यावेत व वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत जनावरांना पिवळे व लाल टॅग बसवण्यात आले आहेत परंतु काही जनावरे मारकी असल्याने कोणी स्कॅन करण्यासाठी जीव धोक्यात घालू शकत नाहीत अश्यात शासनाने छावणी चालकाला एकही बिल अदा न केल्याने मोठी कसरत करावी लागत आहे.
सध्या जाचक अटी हटवून चारा व पाणी नियोजन करण्यासाठी शासनाने सहकार्य करून बिले अदा करावीत व अटी रद्द कराव्यात अन्यथा येणारी 20 मे पासून छावणी बंद करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.
 
Top