उस्मानाबाद /प्रतिनिधी-
केंद्रीय शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा (सीबीएसई) निकाल सोमवार, 6 मे रोजी जाहीर झाला. या परिक्षेत उस्मानाबाद येथील तेरणा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादीत केले आहे. प्रशालेतील 15 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांहून अधिक गुण संपादीत करीत शाळेच्या यशाचा आलेख कायम राखला आहे. शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. शाळेने 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. 
शाळेतील गुणानुक्रमे विद्यार्थी निक्रांत कदम, शितल सावंत (97 टक्के), हसनील पठाण, पद्मनाथ यलगुंडे (96 टक्के), आदर्श कावळे (95 टक्के), सार्थक होनमुटे, शिवम सोळंके, प्रज्वल रोडे (93 टक्के), सोहम जेवे, प्रितम पवार (92 टक्के), श्रीनिवास कठारे (91 टक्के), साहिल हुंबे, प्रतिक मोरे, अजय कोळी, तन्मय माने (90 टक्के) असे आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष एल. एल. पाटील, सचिव अनंतराव उंबरे, प्राचार्य शरथकुमार यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.
 
Top