काटी / प्रतिनिधी-
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे दि. 25 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत आर्ट ऑफ लिव्हिंग शाखेच्यावतीने आनंदाभुती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीरात आपल्या उत्तम मानसिक व शारीराक आरोग्यासाठी सुदर्शन क्रिया, योग, प्राणायम, ध्यान व अमूल्यज्ञान आत्मसात करण्यास मिळणार आहे. सदरील शिबीर हे तामलवाडी येथील सरस्वती मंगल कार्यालयात दि. 25 ते 30 एप्रिल या कालावधीत दररोज पहाटे 5 ते सकाळी 8 या वेळेत होणार आहे. या शिबीरामधून तणावमुक्त व शांत, प्रसन्न, उत्साह मन, रागावर नियंत्रण, नकारात्मक भावनातून मुक्तता, मनाची एकाग्रता व आकलन शक्तीमध्ये वाढ, शारीरिक व्याधीपासून मुक्तता, आत्मविश्वास व स्मरण शक्तीमध्ये वाढ, प्रभावी निर्णय व निरीक्षण क्षमता, निर्मळ व कुशाग्र बुध्दी, सक्षम आरोग्य, रोग प्रतिकारक क्षमतेमध्ये वाढ, कार्यकुशलता व कार्यक्षमतेमध्ये अमुनाग्र वाढ इत्यादी फायदे होवू शकतात.
तरी या शिबीरात मोठ्या संख्येनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजक डॉ. रविकांत गुरव यांनी केले आहे.