प्रतिनिधी / उमरगा
शहरातील ग्रामदैवत श्री महादेव मंदिराच्या यात्रेनिमित्त गुरुवारी (दि. १८) सायंकाळी आयोजित कुस्त्यांच्या फडात कर्नाटकासह बीड, लातूर, सोलापूर व उस्मानाबाद येथील मल्लांनी विविध डावपेच आखून कौशल्य दाखवले. शेवटची कुस्ती रामलिंग मुदगड येथील भैय्या मोरे व खुदावाडी येथील सुंदर जवळगे यांच्यात अर्धा तास चालली. शेवटी पंचांनी ही कुस्ती बरोबरीत काढली.
शहराचे ग्रामदैवत श्री. महादेव मंदिर यात्रेनिमित्त चार दिवसांपासून काठीच्या भव्य मिरवणुकीसह विविध कार्यक्रम घेण्यात आले. गुरुवारी दुपारी कुस्त्यांच्या आखाड्यात लहान, मोठ्या गटातील मल्लांनी अनेक कुस्त्या गाजवल्या. महादेव पंच कमिटीने आयोजित केलेल्या जंगी कुस्त्यांच्या फडात जवळपास तीनशेहुन अधिक मल्लांनी सहभागी होत रंगत आणत १७० मल्लांनी कुस्त्या जिंकल्या. उमरग्याचा अमर मसरे, ज्ञानेश्वर सारणे (पांढरी), राम पुजारी (रामलिंग मुदगड), लहू गोरे (रामलिंग मुदगड), वामन गरड (चिकुंद्रा), तिरूपती दंडगुले (रामलिंग मुदगड), उमाजी मंडले (भूसणीवाडी) यांनी कौशल्य दाखवत कुस्त्या जिंकल्या. (कै.) मदन माकणे, (कै.) अशोक शिंदे यांच्या स्मरणार्थ माजी नगरसेवक राजेंद्र सूरवसे यांच्याकडून शेवटच्या कुस्तीतील विजेत्या मल्लांना विभागून बक्षीस देण्यात आले. कुस्तीच्या फडात एकुण १७० कुस्त्यांसाठी एकूण पन्नास हजार रुपयांची बक्षिसे विविध भागातून आलेल्या विजेत्या मल्लांना देण्यात आली. शिवाजीराव वऱ्हाडे, बळीराम सुरवसे, नरेंद्र इंगळे, अमोल मिरकले, भरत भोसले यांनी पंच म्हणून काम पाहिले. ग्रामदैवत श्री महादेव पंच कमिटीचे अध्यक्ष सखाराम भातागळे, बाबूराव सुरवसे, करबस शिरगुरे, राम पौळ, चंद्रकांत मजगे, राजीव दामशेट्टी, बाबुराव शिंदे, बळीराम कोराळे, गिरीश सूर्यवंशी, विश्वंभर बिराजदार, महावीर कोराळे, राजेंद्र सुरवसे, आकाश शिंदे, मधुकर घोडके, बळीराम सुरवसे, विनोद कोराळे, किशोर शिंदे, कैलास शिंदे, दिनेश शिंदे, नितीन सूर्यवंशी, सिद्धेश्वर कलशेट्टी आदींनी पुढाकार घेतला.
आखाड्यात विविध जिल्ह्यातून आलेल्या मल्लांनी कुस्तीचे कसब दाखविले. 


 
Top