प्रतिनिधी /उस्मानाबाद
कोर्टात सुरू असलेल्या खटल्याच्या कारणावरून उस्मानाबादेत दोन गटामध्ये झालेल्या सशस्त्र तुंबळ हाणामारीमध्ये अनेकजण जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि.२) रात्री ९ वाजेच्या सुमारास उस्मानाबाद शहरातील गाझीपुरा येथे घडली असून याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटाच्या एकूण २० जणांविरोधात शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याप्रकरणात सय्यद परवेज अब्दुला यांनी रुग्णालयात दिलेल्या जबाबानुसार गाझीपुरा येथे मंगळवारी रात्री सुरेय्या अलिम शेख, अलिम जियाओद्दीन शेख, निजाम जियाओद्दीन शेख, साबेर जियाओद्दीन शेख, इंद्रीस अलिम शेख, इम्रान अलिम शेख, अल्ताफ अलिम शेख, रय्यान मगबुल शेख, मोहसीन मगबुल शेख, ईसाक अलिम शेख व २ महिला (सर्व रा. उस्मानाबाद ) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन कोर्टातील केस काढून घे म्हणत घरात येवुन लोखंडी रॉड, हॉकीस्टीक, चाकुने सय्यद परवेज अब्दुला यांच्यासह त्यांची आई, वडील, चुलते जावेद काझी यांना मारुन गंभीर जखमी केले. यावरून वरील १२ जणाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याच प्रकरणात सबोरोद्दीन जियाओद्दीन शेख (रा. गाजीपुरा)यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सय्यद परवेज अब्दुला, सय्यद अब्दुला कादर काझी, जावेद काझी, वजाहद काझी, इम्रहान काझी व इतर तीन जणांनी सबोरोद्दीन यांच्यासह त्यांच्या पत्नीस तसेच नातेवाईक अलिमोद्दीन जियाओद्दीन, शेख रय्यन अब्दुल शेख , अलिमोद्दीन व शेख मुजाहीद अलिमोद्दीन यांना शिवीगाळ करुन चाकुने वार करुन गंभीर जखमी केले तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. 
 
Top