प्रतनिधी/उस्मानाबाद
शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आैरंगाबाद विद्यापिठ उपकेंद्राला नॅक पिअर टिमने 'अ' दर्जाचे मानांकन दिले आहे.
नॅक मूल्यांकन होऊन ३. २२ गुणांकनांसह 'अ' दर्जा घोषित झाला. याबद्दल उस्मानाबाद उपपरिसरातील शैक्षणिक विभागांतर्फे बुधवारी कार्यक्रम घेण्यात आला. 'इंटर्नल क्वालिटी अश्युरन्स सेल' उस्मानाबाद उपपरीसर विद्यापीठ समितीतर्फे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले. यावेळी संचालिका डॉ. अनार साळुंके यांनी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. सर्वांच्या मेहनतीमुळेच अ दर्जा मिळाला असल्याचे डॉ. साळुंके यांनी बोलताना सांगितले. 
 
Top