लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरातील महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी महेश कुंभार तर उपाध्यक्षपदी ओम पाटील, परमेश्वर चिकटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीची बैठक शहरातील महात्मा बसवेश्वर मंदिरात माधव (पिंटु) वकील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत म.बसवेश्वर  जयंती उत्सव समितीची कार्यकारणी सर्वानुमते निवड करण्यात आली.
सचिव पदी मंगेश बनशेट्टी, बबलु यल्लोरे, मिरवणुक प्रमुखपदी गोटु मुळे, महेश चपळे, प्रशिध्दी प्रमुख संतोष फावडे, अदिंची निवड करण्यात आली. या बैठकीस शिवा स्वामी, दिपक मुळे, बाळासाहेब कोरे, हरी भाऊ लोंखडे, मल्लिनाथ घोंगडे, सतिश जट्टे, गणेश कमलापुरे, सचिन तोडकरी, गणेश पालके, कपिल माशाळकर, बाळु माशाळकर, रामेश्वर वैराकर  सहदेव काडगावे, पप्पु तोडकरी, ओम बिराजदार, विशाल मिटकरी, रामेश्वर काडगावे, अमोल तोडकरी, रामु मिटकरी, यांच्यासह  समाज बाधंव मोठ्या संख्येने उपस्थित होता.
 
Top