प्रतिनिधी/ परंडा
 नेहरू युवा केंद्र उस्मानाबादच्या मार्गदर्शनाखाली आज परंडा येथील सरस्वती प्राथमिक शाळेच्या विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी मतदान एक महात्यौहार उपक्रम राबविण्यात आला.  इयत्ता सातवीच्या विद्यार्थी, विद्यार्थीनी यांनी वेगवेगळी वेशभूषा करून , लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान आशा घोषणा देऊन जनजागृती केली.
वेगवेगळी वेशभूषा केल्या मुळे सर्वाचे लक्ष आकर्षित होत होते. यामध्ये सहभागीनी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी आपले पालकाना व इतरांनामध्ये जजनजागृती करण्याची शपथ घेतली. कल्याणसागर समूहाच्या सचिव सौ. प्रज्ञाताई कुलकर्णी, मु.अ. श्री किरण गरड यांच्यासह सरस्वती शाळेचे हरिश्चंद्र पवार, प्रशांत कोल्हे, अमोल कोकाटे, भरत थिटे , सौ. रजणी पाटील, जयसिंग बुरंगे , नरसिंह    सोनवणे, सचिन शिंदे,  कल्याणसागर माध्यमिक शाळेचे महादेव नरुटे , चंद्रकांत तनपुरे, अजित गव्हाणे, मुकुंद भोसले, संतोष माळी , सतीश चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

 
Top