प्रतिनिधी/ तुळजापूर-
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महिलांनसाठी दोन व दिव्यांगसाठी एक अशा वोटींग केंद्राची निर्मिती केल्याची माहीती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाअधिकारी डॉ. चारुशिला देशमुख यांनी दिली.
निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार तुळजापूर विधानसभा मतदारसंघात तुळजापूर नगरपरिषद हाँल मतदान केंद्र क्रक्रमांक 171 व उपकोषागर कार्यालय तुळजापूर 192 येथे सखी मतदान केंद्राची निर्मिती केली असुन या दोन्ही मतदान केंद्राची जबाबदारी महिला पोलिस कर्मचारी , मतदान केंद्र अधिकारी सह सर्व कामे महिला पहाणार आहेत. निवडणूकित महिलांची कामगिरी सिध्द व्हावी यासाठी पथमच  सखी मतदान केंद्र कार्यान्वित केले आहे. तसेच दिव्यांग मतदान केंद्र क्रक्रमांक 262  जि.प. प्राथमिक शाळा पुर्वबाजू कार्ला  येथे कार्यान्वित केले असुन येथे दिव्यांग कर्मचारी कार्यान्वित असणार आहे

 
Top