उस्मानाबाद/प्रतिनिधी-
  महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षतर्फे राज्यातील एम एड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) येत्या ३१ मे रोजी रोजी घेण्यात येणार आहे. या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणीसाठी १० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. एम एड प्रवेशासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षणशास्त्र विभागात हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.   प्रवेशपूर्व परिक्षेसाठी महासीईटी या संकेतस्थळावर २६  मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत होती. तथापी आता १५ दिवस मुदतवाढ दिली आहे. शिक्षण शास्त्र विभाग, विद्यापीठ उपपरिसर, उस्मानाबाद येथे एम एडसाठी ५० जागा  सीईटी मार्फत भरण्यात आहेत.  या ठिकाणी विभागप्रमुख डॉ मनीषा असोरे, डॉ जे एस शिंदे, डॉ महेश्वर कळलावे हे मार्गदर्शनासाठी उपलब्ध आहेत. कोणत्याही पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातिल विद्यार्थी तसेच शिक्षणशास्त्र पदविका (डि एड) उत्तीर्ण विद्यार्थी सीईटी देण्यासाठी पात्र आहेत. या केंद्रावरून संबंधित विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तरी संबंधितांनी  संपर्क साधण्याचे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे. 
 
Top