उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाच्या एसएसटी पथकाने भांडगाव-माणकेश्वर रोडवर मंगळवारी (दि.१६) कारवाईक करून अडीच लाख रुपयांची दारू जप्त केली. सोलापूर येथून भूमकडे (क्र. एमएच ४५ टी ३०२४) वाहन जात होते. माणकेश्वर-भांडगाव मार्गावर निवडणूक विभागाच्या पथकाच्या निदर्शनास आले. त्यांनी वाहनाची तपासणी केली असता अडीच लाख रुपये किमतीची ८९० लिटर देशी दारू आढळून आली. पथक प्रमुख एस. जे. पठाण, सहाय्यक मुंडे, ग्रामसेवक चौधरी, पोलिस कर्मचारी अफरोज शेख, बापूराव कदम यांनी ही कारवाई केली. सर्व माल पोलिसाच्या ताब्यात देण्यात आला आहे. 
 
Top