तेर /प्रतिनिधी
उस्मानाबाद शहरांसह चार गाव पाणी पुरवठा करणाऱ्या तेरणा मध्यम प्रकल्पास जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी रविवार दिनांक 31 मार्च रोजी दुपारच्या सुमारास भेट देऊन पाहाणी करत तेरणा धरणातून कुठली यंत्रणा किती पाणी उपसा करते याची माहिती जाणून घेतली.        
तेरसह चार गाव पाणीपुरवठा योजना चालविणा-या  महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाच्या जलशुद्धीकरण केंद्रास ही जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी भेट देऊन पाहाणी केली. आणखी किती दिवस पाणी पुरेल याचा आढावा घेतला.धरणातील गढूळ पाण्याविषयी ही प्राधीकरणाच्या आधिका-याना विचारणा केली. यावेळी महाराष्ट्र जिवन प्राधीकरणचे कार्यकारी अभियंता राजकुमार पांडव, सहाय्यक कार्यकारी अभियंता प्रशांत बुरूडे, तांत्रिक सहाय्यक शिवाजी किरनाळे यांची उपस्थिती होती.

 
Top