प्रतिनिधी/ उमरगा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू असलेल्या तालुक्यातील विविध विभागाची जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी सोमवारी पाहणी केली. दरम्यान लोकसभा निवडणुकीचे निरीक्षक अशोक संघवान यांनीही भेट देऊन मतदान केंद्र आणि स्ट्राँगरूमची पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या.
जिल्हाधिकारी मुंडे यांनी सोमवारी दीड वाजता लोकसभा निवडणूक संदर्भात भेट देऊन प्रारंभी तहसील कार्यालयात क्षेत्रिय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीचे काम करताना आवश्यक त्या सूचनांचे पालन करून जबाबदारी पूर्ण करण्याचे आवाहन केले. पाहणी दौऱ्यात महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर असलेल्या तलमोड व कसगी येथे आचार संहितेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सीमेवरील तपासणी केंद्राची व बैठ्या पथकांची त्यांनी पाहणी करून आवश्यक सूचना केल्या. दुपारी शहरातील दोन महिला मतदान केंद्राची तसेच गुंजोटी येथील सहा, तुरोरी, दाळिंब व येणेगूर मतदान केंद्राची पाहणी केली. शहरातील पंचायत समितीच्या सभागृहात सुरू असलेल्या मतदान यंत्र व व्हीव्हीपॅड मशिनच्या प्रात्यक्षिक केंद्राला भेट दिली.
 
Top