प्रतिनिधी/ उस्मानाबाद-
लोहारा पोलिस ठाण्यांतर्गत तावशीगड येथे १९७५ मध्ये पडलेल्या दरोड्यातील चोरीस गेलेले दागिने तब्बल ४४ वर्षानंतर पोलिस दलाने फिर्यादीचा शोध घेऊन त्यांना पोलिस अधीक्षकांच्या हस्ते परत केले. 
शिवराम बिराजदार यांच्या घरावर दरोडा पडला होता. याप्रकरणी लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन तपास अधिकाऱ्यांनी आरोपींना गजाआड करत त्यावेळी सोन्याच्या पाटल्या दोन नग, सोन्याची अंगठी एक नग , ३१ मन्याची बोरमाळ आदी ६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आरोपींकडून जप्त केले होते. या प्रकरणी आरोपी भिमा कांबळे व इतरांवर खटला चालून तत्कालीन लातुर सत्र न्यायालयात १९७६ मध्येच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. या शिक्षेविरोधात हायकोर्टात अपिल होऊन १९८० मध्ये सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवण्यात आला. परंतु, तेव्हापासून २००९ पर्यंत जप्त दागिने लातुरच्या न्यायालयीन कस्टडीत होते. सदरील दागिने लोहारा पोलिसांना सुपूर्द करण्यात आले. परंतु, जुन्या प्रकरणामुळे फिर्यादीची ओळख लागत नसल्याचे कारणावरून ते धुळखात पडले होते. त्यानुसार हायकोर्टातून निकालाची कॉपी मिळवून फिर्यादी बिरादार यांचा शोध घेण्यात आला. 
पोलिसांनी मूळ फिर्यादीला चोरीला गेलेले दागिने परत केले. 
 
Top