प्रतिनिधी/
तुळजापूर
गर्दीच्या पार्श्वभूमीवर कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा चरणतीर्थ पुजेसाठी भवानी शंकर गेट किंवा मुख दर्शन गेट मार्गे सोडण्याची मागणी स्थानिक भक्तांनी केली आहे.
चैत्र पोर्णिमा यात्रा तसेच उन्हाळी सुट्ट्या यामुळे दिवसेंदिवस भाविकांचा गर्दीत वाढ होत आहे. गर्दीमुळे चरणतीर्थ पुजेसाठी पोहोचण्यास विलंब लागत आहे. यामुळे चरणतीर्थ पुजेसाठी भवानी शंकर गेट मार्गे किंवा मुख दर्शन गेट मार्गे सोडण्याची मागणी मंदिर संस्थानचे धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुल यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर सुचित्रा वाघमारे, सविता गंगणे, स्वाती शिंदे, मनिषा चाटुफळे, चित्रा अमृतराव, शांता सुळ, पार्वती गायकवाड, अनुसया कवडे, रोहीनी सरवदे, महानंदा इंगळे, श्रीकांत सावंत, पंकज घोडके, दत्तात्रय कोल्हे, कबीर करंडे, सुदर्शन इंगळे आदींचा स्वाक्षरी आहेत 
 
Top