तुळजापूर
/प्रतिनिधी
काश्मीरमधील पुलवामा हल्लयात शहीद झालेल्या बुलढाण्यातील दोन जवानांच्या कुटुंबियांना  मराठवाडा जनविकास संघ आणि विजयराज नागरी सहकारी पतसंस्था यांच्यातर्फे प्रत्येकी एक्कावन्न हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश अध्यक्ष अरुण पवारांचा हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी शहीद जवान संजयसिंह राजपुत यांचे पुञ जय  यांनी भारतमातेच्या रक्षणासाठी मी सैन्य दलात भरती होणार आसल्याचे यावेळी सांगितले .
 यावेळी शहीद जवान संजयसिंह राजपूत व नितीन राठोड यांच्या वीरपत्नी, वीरमाता आणि कुटुंबातील सदस्य,  दत्तात्रय धोंडगे, सूर्यकांत कुरुलकर, मराठवाडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश इंगोले, मारुती बाणेवार,  लेवा भ्रातृ मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम पिंपळे, कार्याध्यक्ष कृष्णाजी खडसे, अमित नाफडे, मलकापूरचे नगराध्यक्ष अॅड. हरीष रावल, दिलीप बढे, बळीराम माळी, डॉ. दिनेश गाडेकर, विजय वडमारे आदी उपस्थित होते.

 
Top