उस्मानाबाद/प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्ह्यातून चारा छावणीचे 174 प्रस्ताव मंजुरीसाठी प्रशासनाकडे पाठवण्यात आले होते मात्र केवळ 56 प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, प्रशासनाकडून अद्याप 118 चारा छावण्यांना तांत्रिक अडचणीमुळे मंजुरी दिलेली नाही.त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आह़े व चाऱ्याअभावी जनावरे जगविणे मुश्किल झाले असून, प्रशासनाने प्रस्ताव देणाऱ्या संस्था सक्षम नसतील तर शासकीय यंत्रणा उभी करावी व  छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी आ.राणा जगजीतसिंह पाटील यांनी मदत व पुनर्वसन सचिवांकडे केली आहे.
जिल्ह्यात लहान-मोठ्या पशुधनाची संख्या 7 लाख 37 हजाराच्या घरात आहे. यामध्ये 4 लाख 12 हजार 14 मोठी जनावरे, 1 लाख 13 हजार लहान जनावरे तर 2 लाख 11 हजार 542 शेळ्या-मेंढ्या आहेत.दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने  जनावरांचे चारा व पाण्याअभावी प्रचंड हाल होत असून प्रशासनाकडून जनावरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी तातडीने उपाययोजना करावी.निवडणुकीमुळे जर शासकीय कर्मचाऱ्यांची कमी असेल व ते व्यस्त असतील तर उपलब्ध कर्मचाऱ्यांना तात्पुरते अधिकार प्रदान करण्यात यावे अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.
 
Top