उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरातील व्यवस्थापनशास्त्र विभागात मंगळवारी (दि. २) रक्तदान शिबिर घेण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीचे यासाठी सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांसह, कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव, डॉ. गणेश साळुंके, समन्वयक प्रा. सचिन बसैये, विक्रम शिंदे व प्रा. वरुण कळसे यांची शिबिरास उपस्थिती होती. 
 
Top