प्रतिनिधी/तुळजापूर-
तालुक्यातील मोर्डा येथे  हनुमान जयंती निमित्ताने श्री विठ्ठल रूक्मणी मंदीर कळसरोहन व लक्षमण शक्ती सोहळा शुक्रवार दि.19 एप्रिल 2019 रोजी  विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लक्षमण शक्ती सोहळास गुरुवार दि.18 रोजी सांयकाळी ६ वा. विधीवत आरंभ होणार आहे.  शुक्रवार 5वा. दि.19 रोजी सकाळी सुर्यादयास गुलाल उधळण  कार्यक्रम नंतर महाआरती.  नंतर सकाळी सात वाजता होमयज्ञ आरंभ नंतर तो संपल्यानंतर कलश मिरवणूक होमयज्ञा सांगता. सकाळी दहा वाजता हभप महंत ब्रम्हगिरी महाराज हस्ते कलश रोहण कार्यक्रम नंतर साडेबारा ते साडेचार भजनी भारुडाचा कार्यक्रम नंतर पाच ते आठ महापंगत नंतर राञी हभप हसन महाराज कुर्डु यांचे किर्तन होणार आहे. या सोहळयास ग्रामस्थानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जय हनुमान याञा कमिटी मोर्डा यांनी केले आहे.

 
Top