| उस्मानाबाद/प्रतिनिधी- तालुक्यातील गोवर्धनवाडी येथे दि.४ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची बदनामी होण्याच्या दृष्टीने डबिंग व्हीडीओ क्लिप संगणकाच्या सहाय्याने तयार करून ती सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी एकाविरूध्द ढोकी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आले आहे. या क्लिपमध्ये डंबिंग करुन ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांविषयी अपशब्द बोलत असल्याचे भासवून व्हिडीओ क्लीप फेसबुक, वॉट्सॲपवर प्रसारित करत बदनामी करण्यात आली. याप्रकरणी ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. |