उस्मानाबाद/ प्रतिनिधी -
जिल्ह्यात दि.१८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सोमवारी (दि.१५) महिलांचे एकत्रीकरण जिल्हा क्रीडा संकुलात उदंड उत्साहात झाले. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना समाजाच्या तुम्ही खऱ्या मार्गदर्शक आहात, पालक आहात, १८ एप्रिलला तुम्ही तर मतदान कराच परंतु, कुटुंबातल्या प्रत्येक मतदाराने मतदान करावे यासाठीही हट्ट धरावा असे आवाहन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, स्वीपचे नोडल अधिकारी तहसीलदार अभय मस्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडीक,शिवाजी चंदनशिवे, विस्तार अधिकारी संतोष माळी, टी.एफ.काझी, अशोक बनसोडे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक अधिकारी शोभा कुलकर्णी, उमेदचे बळीराम मुंडे, जिल्हा आपती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे, प्राचार्या डॉ. अनार साळुंके, महिला विनीता कुलकर्णी, सी.एम.फेलो पल्लवी सांगळे व प्रियंका कारंडे, बचतगटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
Top