उस्मानाबाद,/ प्रतिनिधी-
 भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त सूचनेनुसार सार्वत्रिक निवडणूक 2019 अंतर्गत 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारादरम्यान झालेल्या निवडणूक खर्चाच्या लेख्याची तृतीय तपासणी काल दि.17 एप्रिल  रोजी पी. सुधाकर नाईक, निवडणूक निरीक्षक (खर्च सनियंत्रण) यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. या निवडणूक खर्च तपासणीसाठी सर्व उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक खर्च निरीक्षक, जिल्हा खर्च संनियंत्रण कक्षात नियुक्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या तपासणीअंती राजकीय पक्ष व उमेदवारांसाठी खर्चासंबंधीच्या वेळोवेळी प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने उमेदवारनिहाय खर्चाचे लेखे ठेवणे, छायांकीत निरीक्षण नोंदवही व पुराव्याचे फोल्डर जतन करणेबाबत योग्य ती कार्यवाही करणेबाबत निर्देश देण्यात आले.
या तपासणी बैठकीस नोडल ऑफीसर, खर्च नियंत्रण कक्ष, श्री.शेखर शेटे, सहाय्यक नोडल ऑफीसर खर्च नियंत्रण कक्ष श्री. किरण घोटकर, संपर्क अधिकारी श्री.सचिन कवठे, व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 
Top