उस्मानाबाद /प्रतिनिधी- बसमधून तस्करीच्या मार्गाने नेण्यात येणारा गांजा निवडणूक विभागाच्या स्थिर पथकाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आल आहे. ही कारवाई दि.१५ रोजी उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथे करण्यात आली असून याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उमरगा येथे स्थीर पथक क्रमांक.१२ चे प्रमुख सचिन नेताजी मुळे हे कर्तव्य बजावित होते. यावेळी त्यांनी बस क्र. के. ए. ३२ एफ २४८१ गुलबर्गा ते लातुर थांबवून तपासणी करण्यात येत होती. यावेळी बसमध्ये तपासणी सुरू असताना एक महिला सुग्राबी ख्वाजा शेख हिच्याजवळ गांजाचे पाकिट (किंमत ३८४००) मिळुन आले. याप्रकरणी उमरगा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. |