जिल्हाधिकारी कार्यालय , स्वीप कक्ष ,जिल्हा माहिती कार्यालय व नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उस्मानाबाद येथे सुरू करण्यात आलेल्या
मतदान जागृती कक्षाला आज रोजी पर्यंत 150 नागरिकांनी भेट देऊन मतदान संकल्प पत्र भरून दिले. नागरिकांनी दिला छान प्रतिसाद, तुम्ही मतदान करा व इतरांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करा असा दिला जातो संदेश. नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक श्री धनंजय काळे यांच्या मार्गदर्शनखाली नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक मतदार जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.