उस्मानाबाद,/प्रतिनिधी -
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी 242 उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघामध्ये 1.केंद्र क्रमांक 360, भोसले हायस्कूल, उस्मानाबाद, २.केंद्र क्रमांक 300, प्रशासकीय इमारत उस्मानाबाद ३.केंद्र क्रमांक 372 सांजा आणि ४.केंद्र क्रमांक 48 करंजकल्ला असे 4 सखी मतदान केंद्र राहणार आहेत.
विशेष म्हणजे या चारही मतदान केंद्रांवर सर्व जबाबदारी महिलांचीच असणार आहे. प्रत्येक केंद्रावर मतदान कर्मचारी, पोलिस कर्मचारी अशी कामे महिला कर्मचारीच पार पाडणार आहेत. या निवडणुकीत महिलांची कामगिरी सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगाने सखी मतदान केंद्र स्थापन करून महिलांना अनमोल संधी दिली आहे. 2019 च्या या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रथमच सखी मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
या निवडणूकीत प्रथमच दिव्यांगांसाठीही मतदान केंद्र क्रमांक 308, एकात्मिक बालविकास सेवा योजना, जुनी जिल्हा परिषद इमारत, उस्मानाबाद येथे स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रावर दिव्यांग कर्मचारी हे निवडणूक कामकाजही पाहणार आहेत, त्यामुळे दिव्यांग कर्मचारी ह्या राष्ट्रीय कामात मागे नाहीत, हे सिद्ध होणार आहे.
सखी मतदान केंद्र व दिव्यांग मतदान केंद्र स्थापन करण्यासाठी स्वतः महिला असलेल्या जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांनी चोखपणे नियोजन केले आहे व त्यांच्या पुढाकाराने महिला व दिव्यांग कर्मचारीही निवडणुकीच्या या राष्ट्रीय कामात मागे नाहीत, हे सिद्ध होणार आहे.