प्रतिनिधी / उस्मानाबाद
भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०१९ ची प्रक्रिया सुरू आहे. यानुसार उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून अशोक संगवान (आयएएस) यांची निवडणूक निरीक्षक (जनरल) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 
निवडणूक निरीक्षक अशोक संगवान हे नुकतेच उस्मानाबादेत दाखल झाले असून त्यांचे वास्तव्य निवडणूक काळात शिंगोली शासकीय विश्रामगृह,औरंगाबाद रोड उस्मानाबाद येथे राहणार आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्र. ९४०४६०४७०१ व ९४०४६०८७०३ असा आहे. उस्मानाबाद लोकसभा परिक्षेत्रातील नागरिकांना लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात काही तक्रारी असतील, तर निवडणूक निरीक्षक संगवान यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे. 
 
Top