प्रतिनिधी /
उस्मानाबाद
पोलिस अधीक्षक आर. राजा यांनी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अनुषंगाने बुधवारी (दि.२७) पोलिस अधीक्षक कार्यालयात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी बोलताना पाेलिस अधीक्षक आर. राजा यांनी आदर्श आचार संहितेचे सर्वांनी पुर्णपने पालन करण्याचे आवाहन केले. आचार संहितेबाबत त्यांच्या शंकाचे निरसन करून महत्वाचे व अती महत्वाचे सुरक्षितेच्या अनुषंगाने वर्मा आयोगामधील दिलेल्या मार्गदर्शक सूचना समजावुन सांगितल्या. यावेळी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आश्वासन दिले. तसेच सोशल मिडीयाच्या गैरवापराविषयी निगरानी राहणार असल्याचे यावेळी आर. राजा यांनी सांगितले. यावेळी अधिकारी, पदाधिकारी हजर होते. 
 
Top