उस्मानाबाद-प्रतिनिधी 
शैक्षणिकदृष्ट्या मागास जिल्ह्यात स्मार्ट रूम, प्लेसमेंट, ग्रामीण भागासाठी काम, मुलींसाठी सुसज्ज वसतीगृह, स्मार्ट रूम, जल व भूमीसाठी संशोधन, प्लेसमेंट, ग्रामीण भागा साठी काम, ग्रंथालय सेवा, मुलींना मोफत भोजन यासह विविध सुविधा विद्यापीठ उपकेंद्रात पुरविण्यात येत असून, या कामाबद्दल 'नॅक पिअर टीम'ने समाधान व्यक्त केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे 'नॅक' मूल्यांकन करण्यासाठी पिअर टीम २५ मार्चपासून आली असून उपपरिसरातील शैक्षणिक विभागांचे सादरीकरण मंगळवारी (दि. २६) करण्यात आले. राष्ट्रीय अधिमान्यता व अधीस्वीकृतीच्या 'पिअर' समितीमार्फत कुलगुरू डॉ. आदित्य शास्त्री व सदस्यांसमोर मंगळवारी दुपारी १२ ते २ या दरम्यान व्यवस्थापन परिषद कक्षात हे सादरीकरण झाले. उपपरिसर बोर्डचे अध्यक्ष तथा प्रकुलगुरू डॉ अशोक तेजनकर यांनी 'पीपीटी'द्वारे सादरीकरण केले. यावेळी कुलगुरू डॉ बी. ए. चोपडे, कुलसचिव डॉ साधना पांडे, आयक्यूएसी संचालक डॉ महेंद्र शिरसाट, उपपरिसर संचालक डॉ. अनार साळुंके आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 
 
Top