शिवसेनेच्या उस्मानाबाद जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदी ज्येष्ठ शिवसैनिक शंकरराव बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बोरकर यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबईत नियुक्तीपत्र दिले.
बोरकर यांनी यापूर्वी भूम-परंडा-वाशी विधानसभा निवडणूक लढविली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी बोरकर यांचे नाव चर्चेत होते. आेमप्रकाश राजेनिंबाळकर यंाच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच बोरकर याना सहसंपर्कप्रमुखपद देण्यात आले. झालेल्या नियुक्तीनंतर बोरकर यांचा उद्धव ठाकरे यांनी सत्कार केला. यावेळी उपनेते प्रा.तानाजी सावंत, माजी आमदार ओमराजे, जिल्हाप्रमुख कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, रवी कोरे आदी उपस्थित होते.
सहसंपर्कप्रमुखपदी निवड झाल्यानंतर बोरकर यांचा सत्कार झाला.
|