उस्मानाबाद-
प्रतिनिधी 
हजरत ख्वॉजा शमशोद्दीन गाजी यांच्या ऊरूसानिमित्त शनिवारी (दि.२३) सायंकाळी संदल मिरवणूक काढण्यात आली. पोस्ट ऑफीसजवळील अरब मस्जिद येथे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांनी डोक्यावर संदल घेऊन मिरवणुकीस प्रारंभ केला. त्यानंतर शिवसेनेचे जयप्रकाश राजेनिंबाळकर, राष्ट्रवादीचे मल्हार पाटील व मानकऱ्यांनी संदल डोक्यावर घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला. मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 
हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी यांचा उरूस सुरू झाला असून. सायंकाळी संदल मिरवणुकीस प्रारंभ झाला. त्यानंतर विविध पक्षाचे राजकीय पुढारी व मानकरी संदल डोक्यावर घेऊन अरब मस्जिद ते सावरकर चौक, मारवाड गल्ली, माऊली चौक, आझाद चौक, विजय चौकमार्गे दर्गाह येऊन धार्मिक विधी करण्यात आले. 
निवासी उपजिल्हाधिकारी खंदारे यांच्या डोक्यावर संदल देण्यात आली. 

 
Top