उस्मानाबाद / उमरगा- प्रतिनिधी  
पोलिस अधीक्षक आर. राजा व उमरगा तालुक्यातील भिकार सांगवीचे रहिवासी व सध्या पुणे येथे पोलिस उपनिरीक्षक असलेल्या श्रीधर भोसले यांना पोलिस दलाचे विशेष सेवापदक जाहीर झाले आहे. 
नक्षलग्रस्त भागात कर्तव्यावर असताना केलेल्या विशेष कामगिरीबद्दल दोघांना विशेष सेवापदक जाहीर झाले. गडचिरोली, चंद्रपूर, गाेंदिया, भंडारा, नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात पोलिस अधीक्षक राजा आर. स्वामी यांनी दोन वर्षे कठीण व खडतर कामगिरी बजावल्याबद्दल त्यांना हे विशेष सेवापदक जाहीर झाले आहे. तर मुळचे उमरगा तालुक्यातील व सध्या पुणे शहरात चंदननगर येथे पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत श्रीधर पांडुरंग भोसले यांनी गडचिरोली, भामरागड भागात उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल हे पदक जाहीर झाले आहे. 
 
Top