उस्मानाबाद /प्रतिनिधी
 जिल्हा प्रशासनातर्फे स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती करण्यात येत आहे.येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत १८ एप्रिल रोजी एकही मतदार मतदानाशिवाय राहणार नाही,असा निश्चय प्रत्येक मतदाराने करावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध माध्यमातून मतदारांचे प्रबोधन करीत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाने एक स्टिकर तयार केले असून ते स्टिकर दुचाकी-चारचाकी वाहने, एटीएम सेंटर, घरातले पिण्याच्या पाण्याचे माठ, अशा विविध दर्शनी भागांवर चिकटविण्यात येत आहेत. 
 
Top