धाराशिव (प्रतिनिधी)- येथील जिल्हा रुग्णालयात 18 नोव्हेंबर रोजी 9 वा राष्ट्रीय निसर्गोपचार दिवस साजरा करण्यात आला. आयुष मंत्रालय भारत सरकार, नॅशनल ऑफ नॅचरोपॅथी पुणे व इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन सुर्य फाऊंडेशन यांच्या संयुक्त सहयोगाने याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. धनंजय चाकूरकर, डॉ. फुलारी, अतुल जगताप, आयुष विभागाचे डॉ. अब्रार, डॉ. सीमा पवार, डॉ. सय्यद हे उपस्थीत होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी डॉ. चाकूरकर यांनी निसर्गोपचार कसा आत्मसात करावा, जीवनशैली कशी असावी याबद्दल मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाची प्रस्तावना भारत हिंगमिरे यांनी केली.