कळंब (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या खेळाडूंनी तालुकास्तरावर प्रथम क्रमांक व जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल कळंब येथील मोबीन शेख व मित्रपरिवार कळंब शहरवासीयाच्यावतीने खेळाडूंचा ट्रॉफी वही पेन व बुके व प्रशिक्षकांचा शाल श्रीफळ , बुके व पेन देऊन सन्मान करण्यात आले.

14 वर्ष वयोगट मुली संघ कु. अनु भालेराव, वैष्णवी जावळे, मंतशा पठाण, जोया पठाण, शाहिस्ता शेख. 17 वर्ष वयोगट मुली संघ कु. अल्मास पठाण, प्राची इंगळे, जोया शेख, निशा काकडे, आकांक्षा डाके. मार्गदर्शक शिक्षक श्री. डी.ओ.पवार, अनिल शेळके,  यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक बी.डी. कदम यांचाही उत्तम प्रशासनाबद्दल सन्मान करण्यात आला .या प्रसंगी साजिद काझी, विकास कदम, कर सल्लागार बिदादा साहेब, बाबू सय्यद, सद्दीम तांबोळी,समिती अध्यक्षा मीना जावळे , गणेश अंबाड,शुभांगी नखाते, ए.एम .काझी, सूर्यकांत वाघमारे ,सविता घंटे, संध्या लाटे, अर्चना घुटे, सारिका माळी, हनुमंत झोंबाडे , जाहिराबी शेख यांनी उपस्थित राहून अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.ओ.पवार यांनी केले तर आभार श्री. सुनील दत्त मस्के यांनी मानले.

 
Top