उमरगा (प्रतिनिधी)-  एखाद्या व्यवसायास पैसे कमविण्याचे साधन न समजता ते गोर गरीब जनतेची सेवा करण्याचे वृत्त समजून कार्य केल्यास समाजात आदर्श निर्माण होइल असे विचार निवृत्त उपअभियंता संजय सरपे यांनी व्यक्त केले.

उमरगा शहरातील श्रमजीवी महाविद्यालय शेजारी डॉ पंतगे कॉम्पेल्क्स मध्ये बांधलेल्या नूतन श्रद्धा मिनी मंगल कार्यालय व फंक्शन हॉलचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सरपे बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून कर्मयोगी डॉ दामोदरराव पंतगे  व प्रमुख पाहुणे म्हणून प्रथम फांडडेशन संस्थेचे जिल्हा संपर्क अधिकारी प्रा सुमीत कोथिंबीरे व उमरगा नगर परिषेदेचे निवृत्त अधिकारी बाबुराव जाधव हे उपस्थित होते.

यावेळी सरपे पुढे बोलतांना म्हणाले, डॉ पतंगे यांनी आपल्या काराकीर्दीत एक आदर्श डॉक्टर बनून निस्वार्थपणे रुग्नांची सेवा केली.  त्यांनी अनेक समाजोपयोगी संस्थांची उभारणी केली. यावेळी प्रा सुमित कोथिंबीरे यांचेही भाषण झाले. यावेळी मंगल कार्यालयाचे उद्घाटन डॉ पतंगे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सरपे बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स मधील 20 बांधकाम कामकारांना 5 लाखाचा अपघाती विमा प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितेश धुर्वे व आभार प्रदर्शन मंगल कार्यालयाचे संचालक प्रदीप मोरे यांनी केले. कार्यक्रमास शहरातील प्रतिष्ठीत नागरीक व महिला मोठ्या संख्येने हजर होत्या.


 
Top