धाराशिव (प्रतिनिधी)- कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाबाबत आमदार कैलास पाटील यांनी काल वस्तुस्थिती समोर आणली,आणि 'बंगल्यावरचे' प्रवक्ते नितीन भोसले यांची चांगलीच धावपळ उडाली! आपल्या नेत्याचे कर्तृत्व उघडे पडू नये या भीतीने त्यांनी दिलेला व्हिडिओ बाईट पाहून हसू आवरत नाही.

भोसले साहेब, सत्य बोलायला स्क्रिप्ट वाचावी लागत नाही! तुम्हाला तब्बल 18 वेळा खाली बघून स्क्रिप्ट वाचावी लागली आणि 6 वेळा व्हिडिओ कट करून पुन्हा सुरू करावा लागला, यातूनच तुमचा आत्मविश्वास आणि 'सत्य' दिसून आले.

आमदार कैलास पाटील यांनी काल पाहणी करताना कुठलीही टीका केली नाही;कोणावरही भाष्य केले नाही.फक्त वस्तुस्थिती समोर आणत हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. ज्या एक टीएमसी पाण्याबाबत आपण बोललात ते कुठल्या योजनेतून येणार आहे हे नितीन भोसले यांनी स्पष्ट करायला हवं होतं.जी योजना हक्काची नाही त्या योजनेतून हे पाणी येणार आहे हे सांगायला नितीन भोसले विसरले आहेत.माढासीना या योजनेतून हे पाणी आणले जाणार आहे.मात्र खरा डाव सत्ताधाऱ्यांचा पुढे आहे हे पाणी आणल्याचे दाखवून घाटणे बॅरेज येथील इलेक्ट्रिसिटीचे बिल उचलायचे आणि काम पूर्ण झाल्याचा कांगावा करायचा असा यांचा डाव आहे.एक टीएमसी पाणी येणार आहे त्याची तारीख यांनी का सांगितली नाही.पिण्यासाठी येणार असेल तर मूळ उजनी धरणातून धाराशिवला पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन असताना सीना नदीतून पिण्याचे पाणी का आणत आहेत याचे उत्तर देखील त्यांनी द्यायला हवे होते.मिरगव्हाण येथे सात पंप असून चार पंप उपसा सिंचन क्रमांक एक साठी सीना कोळेगाव धरणात सोडणार आहे तर उपसा सिंचन क्रमांक दोन साठी तीन पंप बंद पाईपलाईन द्वारे सीना नदीच्या बाजूला काढून पुढे सीना नदीत सोडले जाणार आहे हे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना यात मोठा घोटाळा झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तोच उघडा पडू नये म्हणून आपल्या अकार्यक्षम नेत्याची तळी उचलण्याचा हा केविलवाणा प्रयत्न भोसले यांनी केला. भोसले साहेब पद्मसिंह पाटील तुमचे नेते केव्हापासून झाले तुम्ही तर त्यांचे विरोधक म्हणून काम केलेले आहे.त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही कधीपासून प्रयत्न करत आहात याचे पण जरा सांगायला हवे होते.यापुढे व्हिडिओ करताना टेलीप्रॉम्प्टर लावायला विसरू नका,असा जोरदार प्रहार युवासेनेचे जिल्हा समन्वयक ॲड संजय भोरे यांनी केला आहे.


 
Top