धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे 28 नोव्हेंबर रोजी संपन्न होणारी केंद्रीय विद्यालय जवाहर नवोदय परीक्षेसाठी बसलेल्या 110 विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सिंहगड इमारत खोली वर्ग 02 मध्ये संपन्न झाला. प्रथम संविधान प्रतिमा पुजन करण्यात आले त्यानंतर या समारंभासाठी प्रमुख पाहुणे प्रशालेचे मुरण्याध्यापक नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पालक प्रतिनिधी तमन्ना भातखंडे चौखंडे, देडे याचा पुष्प देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर परीक्षार्थींना उपमुख्याध्यापक प्रमोद कदम यांनी परीक्षेबाबत माहिती सांगितली. त्याचबरोबर पालक प्रतिनिधींनी मनोगते व्यक्त केली. अध्यक्षीय भाषण नंदकुमार नन्नवरे यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या सभारंभ यशस्वीतेसाठी नवोदय परीक्षा प्रमुख तथा इ 5 वी पर्यवेक्षक शेषनाथ वाघ व जादा तासिका अध्यापन करणारे शिक्षक अजित माने , एस.एस. ईश्वरगौडा, भरत नाडे, किशोर साबळे, निवृत्ती देशमुख, शितल ऐवळे, सेवक महादेव काळे, प्रशांत जाधव यांनी परिश्रम घेतले सुत्रसंचलन धम्मपाल ओव्हाळ आभार मानले.
