तुळजापूर (प्रतिनिधी)- कर्नाटक राज्यातील विजापूर येथील भाविक गौरीश मल्लिकार्जुन मलगे यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी 498 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुखवटा अर्पण केला.

गौरीश मल्लिकार्जुन मलगे हे आज सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आले होते. देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी देवीच्या चरणी 498 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुखवटा अर्पण केला. यावेळी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने महेश गंजे यांनी गौरीश मल्लिकार्जुन मलगे यांचा सत्कार केला. याप्रसंगी जय जमदाडे तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.


 
Top