मुरूम (प्रतिनिधी)- स्वप्न मोठं आणि मेहनत त्याहून मोठी... या जिद्दीच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षणात उल्लेखनीय यश संपादन करत डॉ. गौरव अरुणा श्रीकांत मिणियार यांनी ‘एमएस ऑर्थोपेडिक्स' ही उच्च पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. या यशामुळे मिणियार परिवार आणि संपूर्ण परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण असून, गुरुवारी (ता. 12) मुरूम येथील रत्नमाला मंगल कार्यालयात त्यांच्या गौरवार्थ एका दिमाखदार सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
नंदगावचे मठाधिपती राजशेखरजी महाराज यांच्या शुभहस्ते डॉ. गौरव मिणियार यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ डॉ. राधाकृष्ण डागा, डॉ. शिवप्रसाद काबरा, डॉ. लिंबणाप्पा मुदकण्णा, डॉ. घनश्याम दरक (लातूर), श्यामसुंदर मिणियार, जमनाबाई मिणियार, डॉ. राधिका लाटी, डॉ. सुमित लाटी (छ. संभाजीनगर) उद्योजक मधुरजी जाकोटीया (मालेगाव), राधिका जाकोटीया, शोभा मिणियार, श्रीकांत मिणियार, अरुणा मिणियार, लीलावती मिणियार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अरविंद चौधरी, कल्लय्या स्वामी, डॉ. राधाकृष्ण डागा, डॉ. शिवप्रसाद काबरा, अशोक मिणियार, कुमारी तेजस्विनी मुदकण्णा, अमृता मिणियार आदींनी मनोगतातून डॉ. गौरव यांच्या कष्टाचे व यशाचे कौतुक केले. तसेच संपूर्ण मिणियार परिवाराने चित्रफितीद्वारे (व्हिडिओ) गौरवोद्गार व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देताना डॉ. गौरव मिणियार म्हणाले, “आमच्या मिणियार कुटुंबीयांनी जपलेली या पंचक्रोशीतील सामाजिक बांधिलकीची परंपरा मी पुढच्या काळातही तशीच जगेन आणि माझ्या वैद्यकीय सेवेतून कायम समाजसेवा करत राहीन.” याप्रसंगी त्यांनी उपस्थितांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.
या भव्य सोहळ्यास माजी पंचायत समिती सभापती राजासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब पाटील, शिवसेना नेते चंद्रशेखर मुदकण्णा, महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचे चेअरमन शिवशरण वरनाळे, व्यापारी नागरी पतसंस्थेचे चेअरमन उमेश कारभारी, ज्ञानदान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरणाप्पा मुदकण्णा, माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे, रोटरीचे अध्यक्ष कल्लय्या स्वामी, सूत्रय्या स्वामी, प्रशांत मुदकण्णा, गुलाब डोंगरे, विष्णुदास मुंदडा, बालाप्रसाद काबरा, संजू मिणियार, रमेश मिणियार यांच्यासह वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक, सहकार, राजकीय आणि पत्रकार क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी डॉ. गौरव यांना पुढील उज्ज्वल वाटचालीस भरभरून शुभाशीर्वाद दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिती झंवर यांनी केले, तर श्रीकांत मिणियार यांनी आभार मानताना उपस्थितांची उपस्थिती हीच आमच्यासाठी प्रेरणादायी व अभिमानाची असल्याचे सांगितले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मुरूम येथील माहेश्वरी युवक मंडळ व माहेश्वरी प्रगती मंडळाने विशेष पुढाकार घेतला. कष्टाच्या जोरावर मिळवलेले हे यश परिसरातील तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत असून, सर्वच स्तरातून डॉ. गौरव मिणियार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
