तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे राष्ट्रकूटकालिन अंग्निखंड दगडापासून तयार करण्यात आलेली कार्तिकस्वामीची मुर्ती असून दरवर्षीप्रमाणे कार्तिक पौर्णिमेला दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

धाराशिव तालुक्यातील तेर येथे राष्ट्रकूटकालिन अंग्निखंड दगडापासून तयार केलेली पुरातन कार्तिकस्वामीची मुर्ती असून मुर्तीची उंची 90 से.मी.तर रुंदी 70 से.मी.आहे.वाहन मोरावर आसनस्थ आरूढ व चतुभ्रूज मुर्ती असून हातात खड्स आहे.कार्तिकस्वामीची मुर्ती उत्कृष्ट आभूषणांनी युक्त आहे.मस्तकावर अतिशय बारीक कोरीवकाम केलेला कलात्मक मुकूट आहे.बाजूला मोत्याचे झुपके आहेत.कार्तिकस्वामीचा मुकूट म्हणजे उत्कृष्ट कोरीव कामाचा उत्तम नमुना आहे.त्यांच्या कानामध्ये मकर कुंडले आहेत.गळयात ग्रीवीका अतिशय देखणी आणि वेगळी आहे दंडात केयूर आहे.केयूराची पट्टी वर असून खाली मोत्यासारखी नक्षी आहे.हातात दोन दोन कंकण आहेत.तीन पदरी मणी यज्ञोपवीत,उदरबंद आभूषणे आहेत .बोटामध्ये अंगुलिकाही दिसतात.कार्तिकस्वामीचे पाय सूर्यप्रतिमेसारखे दिसतात . कार्तिकस्वामीच्या मस्तकामागे ज्वालेसारखे दिसणारे प्रभावलय आहे.प्रमाणबद्ध शरीरावर कलात्मक बारीक कोरीवकाम केलेली आभूषणे आहेत.मुकूट व ग्रीवीका विशेष देखणी आहे.कार्तिकेय त्यांचे वाहन मोरावर आसनस्थ आहे.मोराने पंख किंचीत पसरले आहेत.मोराच्या पोटावर खवले आहेत. धाराशिव तालुक्यातील तेर येथे राष्ट्रकुलकालीन कार्तिकस्वामीची रांगोळी सारखी चमकणारी राज्यात एकमेव मुर्ती असल्याने कार्तिक पौर्णिमेला कार्तिकस्वामीच्या दर्शनासाठी भाविकभक्त यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.


 
Top