तुळजापूर (प्रतिनिधी)-  महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी दीपावली सुट्यांन पार्श्वभूमीवर  भाविकांची मोठी गर्दी होत आहे  राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी तुळजापूरमध्ये गर्दी करीत आहेत. नरक चतुरर्थी पासून सुरू झालेला भाविकांचा ओघ शुक्रवार पर्यत सुरुच होता. यापुढे शनिवार, रविवार भाविकांची संख्या वाढण्याची मोठी शक्यता आहे. मंदीर प्रशासनावर भाविकांच्या वाढत्या संखेचा प्रचंड ताण येवून यंत्रणा कोलमडत आहे.

नरक चतुर्दशीपासून सुरू झालेला भाविकांचा ओघ सुरूच आहे. दीपावलीच्या तीन दिवसांत सुमारे दोन ते तीन लाख भाविकांनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतल्याचा अंदाज आहे. दीपावली पाडव्याच्या औचित्याने श्री तुळजाभवानी मातेची विशेष पूजा-अर्चा करण्यात आली. यावेळी देवीच्या मूर्तीला शिवकालीन सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले होते. सुवर्ण अलंकारांनी नटलेल्या जगदंबेचे दिव्य आणि मनोहारी रूप भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आईचे दर्शन घेऊन नववर्षाची सुरुवात करण्यासाठी पहाटेपासूनच मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. 

दीपावली पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. या दिवशी आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराटीचे आशीर्वाद मिळावेत, या श्रद्धेने भाविकांनी देवीच्या चरणी माथा टेकवला. दिवाळीच्या सुट्ट्या आणि पाडव्याचा शुभमुहूर्त यामुळे नोकरदार वर्गासह शहरी भागातील भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर दर्शनासाठी सलग 22 तास खुले ठेवण्यात आले आहे. तुळजापूर शहरात सलग सुट्ट्यामुळे खासगी वाहनांची गर्दी झाली असून, शहरात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. 

 
Top