धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, धाराशिव येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. ए. के. मंजुळकर यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रा. डॉ. मदनसिंग गोलवाल, सुमेर कांबळे आणि प्रा. विवेकानंद चव्हाण तसेच ग्रंथालय विभागातील कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
पंडित जवाहरलाल नेहरू यांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, देशाच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य, आधुनिक भारताच्या उभारणीतील त्यांची भूमिका तसेच बालकांवरील त्यांचे प्रेम याविषयी यावेळी विचार व्यक्त करण्यात आले. नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या जीवनकार्यापासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन ज्ञान, विज्ञान आणि आधुनिक विचारांची कास धरावी, असा संदेश ग्रंथपाल डॉ मदनसिंग गोलवाल यांनी.
