भूम (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये इ 9 वी वर्गात शिक्षण घेत असलेला कुणाल नामदेव कांबळे याने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करून यश संपादन केले आहे. त्याची विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. त्याबद्दल त्याचा शाळेच्या वतीने पुष्पहार व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कुणालला क्रीडा विभाग प्रमुख काकासाहेब पवार यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल कुणालचे सर्वत्र कौतुक होत आहे.
