धाराशिव (प्रतिनिधी)- उजनी धरण परिसरात होत असलेल्या एआय डेटा सेंटर (SEED) प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पार्टीच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याकडे दि.30 ऑक्टोबर रोजी केली आहे
दिलेल्या नियोजनात असे नमूद करण्यात आले आहे की, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उजनी जलाशय परिसरात जो प्रकल्प प्रस्तावित आहे. तो तेथील पाण्यासाठी घातक असून या उजनी धरण प्रल्पावरून धाराशिव शहराला पाणी पुरवठा होत असून अगोदरच पाणी दूषित आहे. सोलापूर येथील भूजल चाचणी सर्वेक्षणात तेथील पाण्यात कॅन्सर होण्याचे काही घटक आढळून आले होते. त्यातच आता हा प्रकल्प एआय डेटा सेंटर हा प्रकल्प त्या भागात चालू होणार आहे. तर उजनी धरण हे 117 टीएमसी इतक्या क्षमतेचे असून मागील 40 वर्षांपासून तेथील गाळ काढण्यात आलेला नाही. त्यामुळे उपयोगी पाणी साठा हा खूप कमी प्रमाणात असून त्या धरणावर जवळपास 3 जिल्ह्यांचा पाणी पुरवठा होतो. जर हा प्रकल्प चालू झाला तर या एआय डेटा सेंटरला 0.5 टीएमसी इतके पाणी लागणार असून ते वापरात आलेले पाणी हे विष समानच आहे. ते पाणी या उजनीच्या धरणात मिसळले जाणार आहे. तसेच या एआय डेटा सेंटरचा दुष्परिणाम म्हणजे त्या भागातील पाणी पातळी पूर्णपणे संपणार आहे. त्यामुळे अगोदरच धाराशिव जिल्हा हा दुष्काळी असून जे धाराशिव शहराला मिळणारे पाणी आहे ते देखील भविष्यात मिळणार नाही.
यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पार्टीचे मसूद शेख, धाराशिव युवक शहराध्यक्ष रणवीर इंगळे, नगरसेवक आयाज शेख, खलिफा कुरेशी, इस्माईल बाबा शेख, पंकज भोसले, सरफराज कुरेशी, सुनील आंबेकर, बाबा मुजावर, नरसिंग मिटकरी, एजाज काझी, रोहित बागल, नाशेर शेख, अफरोज पिरजादे, जयंत देशमुख, कादर खान, अशोक पेठे, अविनाश जाधव, योगेश सोन्ने पाटील, सुशांत बनसोडे, शुभम खटके आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
