तुळजापूर (प्रतिनिधी)-  आई तुळजाभवानीच्या  दर्शनासाठी शेकडो किलोमीटरचे अंतर पायी पार करत येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी तेलंगणा राज्यातील जहीराबाद येथील माजी सैनिक व सेवाभावी मंडळी गेल्या 29 वर्षांपासून अन्नदानाचा अखंड उपक्रम या अन्नछत्राचे उद्घाटन  श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तथा तहसीलदार माया माने, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्रीकांत कदम,गटनेते औदुंबर कदम तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी यांच्यासह जहीराबाद येथील सेवाभावी मंडळी उपस्थितीत होते.

कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी विविध भागांतून भाविक पायी प्रवास करतात. अनेक किलोमीटरचा प्रवास करून येणाऱ्या या भाविकांना वाटेत भोजनाची सुविधा उपलब्ध व्हावी. या उद्देशाने जहीराबाद येथील सेवाभावी मंडळी गेल्या 29 वर्षांपासून अन्नदानाचे कार्य करीत आहेत. केवळ धार्मिक भावना नव्हे, तर थकलेल्या भाविकांची भूक भागवून त्यांना पुढील प्रवासासाठी ऊर्जा देण्याचा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

यावेळी मन्या एम. यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, गेल्या 29 वर्षांपासून आम्ही तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदान सेवा करीत आहोत. जहीराबाद तालुक्यातील दानशूर व्यक्तींकडून या उपक्रमाला सातत्याने सहकार्य मिळते. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच हा सेवायज्ञ इतकी वर्षे अखंडपणे सुरू ठेवता आला आहे. भाविकांची सेवा करण्याचे समाधान हेच आमच्यासाठी सर्वांत मोठे बळ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी मरपल्ली शिवसाई, राजू डपूर, एक्केले प्रभू, नरेंद्र रेड्डी, गोदावरी नरेंद्र, स्वामी यांच्यासह अन्य सेवेकरी उपस्थित होते.

 
Top