तुळजापूर (प्रतिनिधी)- अकोला येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनात धाराशिव जिल्ह्याच्या मराठा महासंघ महिला अध्यक्षपदी मिना सोमाजी यांची नियुक्ती पत्र अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष मराठा समाज राजेंद्र कोढरे यांच्या हस्ते देण्यात आले. मीनाताई सोमाजी यांनी यापूर्वी मराठा समाजासाठी अनेक आंदोलने केले आहे. त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
