धाराशिव (प्रतिनिधी)- विधानपरिषद औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धार्मिक स्थळे,रुग्णालये,शैक्षणिक संस्था तसेच सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. 

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये याबाबत आदेश जारी केला आहे. 

हे निर्बंध निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू राहणार आहेत. भारत निवडणूक आयोगाने 22 सप्टेंबर 2026 रोजी विधानपरिषद औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2026 चा कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याच्या दिवसापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. धाराशिव जिल्ह्यात विधानपरिषद औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या हद्दीतील धार्मिक स्थळे,रुग्णालये,शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निर्बंध घालणे आवश्यक असल्याने हे आदेश जारी केले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून हे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील धार्मिक स्थळे,रुग्णालये,शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत.हे आदेश 28 सप्टेंबर 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात अंमलात राहतील.


 
Top