तेर(प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील थोडसरवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयात आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरात ११ रक्तदात्यानी रक्तदान केले.या सामाजिक उपक्रमात थोडसरवाडी येथे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.
