मुरुम (प्रतिनिधी)- यशवंत नगर नवरात्र महोत्सवानिमित्त शुक्रवारी (ता. 16) रोजी आयोजित 'खेळ पैठणीचा' कार्यक्रमास महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. संगीता देशमाने यांच्या आकर्षक सूत्रसंचालनाने रंगत वाढवलेल्या या कार्यक्रमात महिलांनी विविध मनोरंजनात्मक खेळ आणि सुंदर उखाण्यांचा आनंद घेतला.

तीन तास चाललेल्या या सोहळ्यात मनीषा राठोड मुख्य पैठणीच्या मानकरी तर सारिका लोहार उपविजेत्या ठरल्या. उमाश्री साळुंखे यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. सुजाता ढगे, निर्मला बोंगरगे आणि प्रा. विजया बेलकेरी यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेखा घोडके, सोनाली घोडके, सविता गाडेकर, अंजु मोटे, प्रियंका चव्हाण, सविता जाधव, कविता जाधव, सरोजा पाटील, मिना टाचले, पद्मा टाचले, प्रियंका राजपूत, सिमा अष्टगी, सविता धर्माधिकारी, त्रिगुळे, तांबडे आदींनी पुढाकार घेतला. या नवराञ मोहत्सवात दररोज आराधी मंडळींचा भजन संध्या, सांस्कृतिक खेळात कलर बलून जम्प, संगीत खुर्ची, दोरी उड्या, गरबा नृत्य इत्यादी खेळ घेतले गेले. महोत्सव यशस्वीतेसाठी तेजस निलवाडे, श्रीधर निलवाडे, संजय सुरवसे, गौरीशंकर बोंगरगे, चेतन कंटे, धनपाल चौव्हाण, शुभम चौव्हाण, अनिकेत पाटील, निरज पडलवार, विशाल कुंभार, सतीश कुभार, निशांत पडलवार, मानव चव्हाण, सोमनाथ जाधव, ओंकार सुरवसे, प्रितेश राठोड, श्रेयश चव्हाण, उदय घैसास, ओंकार कुंभार, सतीश कुंभार आदी  नवरात्र महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. 

घर आणि संसाराच्या व्यापातून वेळ काढून महिलांच्या सुप्त गुणांना वाव देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यादरम्यान, मराठवाड्यावरील दुष्काळाचे संकट दूर होण्यासाठी देवीच्या चरणी प्रार्थनाही करण्यात आली.


 
Top